चला उत्तरे शोधूया उपक्रम: 1 (माहे: डिसेंबर दुसरा आठवडा)

विद्यार्थी मित्रांनो 10 डिसेंबर 2020 ते 13 डिसेंबर 2020 या काळात आपण खालील प्रश्नांची उत्तरे पाठ्यपुस्तकातून शोधून आपल्या वहीत नोंदवा. 13 डिसेंबर 2020 रोजी सर्व उत्तरे आपल्याला व्हाटस अप ग्रुपवर शेअर केले जातील. आपण उत्तरे तपासून घ्या. 10 डिसेंबर 2020 पासून सुरु होणाऱ्या एन. एम. एम. एस. कृती कार्यक्रमात सहभागी व्हा. सर्व विद्यार्थी मित्रांना या उपक्रमासाठी शुभेच्छा.


 

  • प्रिंट काढणे शक्य नसल्यास खालील प्रश्न पाहून पाठ्यपुस्तकातून उत्तरे शोधा व आपल्या वहीत नोंदवा.

विषय: भूगोल


1) पॅसिफिक महासागरातून प्रवास करताना कोणत्या बेटांजवळ या जहाजातील खेळणी भरलेला एक कंटेनर महासागरात कोसळला व फुटला?


2) समुद्रसपाटीपासून किती मीटर खोलीपर्यंत सूर्यकिरणांची उष्णता पोहचू शकते?


3) पृष्ठभागांवरील प्रवाहांतून महासागरातील किती टक्के पाणी वाहते?


4) सागरपृष्ठापासून किती मीटरपर्यंतचे प्रवाह पृष्ठभागावरील किंवा पृष्ठीय प्रवाह समजले जातात?


5) पृष्ठभागावरील किंवा पृष्ठीय प्रवाहातून होणारा पाण्याचा विसर्ग एककाने मोजला जातो?


6) कोणत्या महासागरावर मान्सून वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे?


7) पॅसिफिक व कोणत्या महासागरांतील प्रवाह प्रणालीत सारखेपणा आहे?


8) कोणत्या महासागरातील प्रवाहचक्र वेगळे आहे?


9) कोणता महासागर उत्तरेकडे भूवेष्टित आहे?


10) उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने कशामुळे फिरतात?


विषय: गणित


1) To construct a unique quadrilateral it is necessary to give ----- of its elements. 1) चौकोन रचना करण्यासाठी कमीत कमी किती घटक देणे आवश्यक आहे ?


2) ABCD is a parallelogram in which AB = 25cm and BC = 50cm .What is its perimeter? समांतरभूज चौकोन ABCD मध्ये बाजू AB = 25cm आणि बाजू BC = 50cm तर त्याची परिमिती किती असेल?


3) In a parallelogram ABCD , if , mA=(3x+12) , mB=(2x-32),then mA = ------समांतरभूज चौकोन ABCD मध्ये mA=(3x+12) , mB=(2x-32) तर mA = -----


4) What is the type of quadrilateral in which the diagonals are congruent and bisect each other at right angles? चौकोनाचे कर्ण एकरूप असून ते परस्परांचे लंब दुभाजक आहेत तर तो चौकोन कोणत्या प्रकारचा असेल?

5) Find the perimeter of a square whose diagonal is 16cm. चौरसाच्या कर्णाची लांबी 16 cm आहे तर त्या चौरसाची परिमिती किती ?


6) The measurements of the opposite angles of a cyclic quadrilateral are (x+10) and (x+20). Find the difference in the measurements of the angles. (चक्रीय चौकोनाच्या संमुख कोनांची मापे (x+10) आणि (x+20) आहेत तर त्या कोनाच्या मापातील फरक किती?)


7) If the sides of a rectangle are (5x+2) and (2x+3) then its perimeter is ------ आयताच्या लगतच्या बाजू अनुक्रमे (5x+2) आणि (2x+3) असतील तर आयताची परिमिती =-------


8) In quradrilateral PQRS , mP=x , mQ=2x , mR=3x ,mS=4x then find the type of quradrilateral PQRS. 2 चौकोन PQRS मध्ये,mP=x , mQ=2x , mR=3x ,mS=4x , तर चौकोन PQRS चा प्रकार कोणता ?


9) If one of the angle of a parallelogram is 24 less than twice the smallest . Then the largest angle of a parallelogram is -------- समांतरभूज चौकोनाचा एक कोन त्याच्या लहान कोनाच्या दुपटीपेक्षा 24 ने कमी आहे तर त्या समांतरभूज चौकोनाच्या मोठ्या कोनाचे माप किती ?


10) PQRS is a rhombus. Diagonal PR = 6cm and diagonal QS = 8cm .Find the perimeter of the Rhombus PQRS. .समभूज चौकोन PQRS च्या कर्ण PR व कर्ण QS ची लांबी अनुक्रमे 6 cm 8cm आहे तर त्याची परिमिती किती?


विषय: सामान्य विज्ञान


1) पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रदव्यपटल करते; यास .................म्हणतात. (If any changes occur outside the cell,the celllular environment does not change due to plasma membrane. This condition is called .........


2) पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाणजास्त असल्याने पाणी पेशीत शिरते. याला ......... म्हणतात.(The cell has less water than outside medium, so water enters the cell.This is called as ..............)


3) पेशीअंगकांव्यतिरिक्तअसलेला पेशीतील भाग म्हणजे ......(The part of cytoplasm other than organelles is the ......)


4)‘काळी अभिक्रियाहे रंजन तंत्र ..........यांनी विकसित केले. (..........developed the staining technique called 'Black reaction')


5) पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थांचे वहन करणाऱ्याअंगकाला ..... म्हणतात.(The organelle which conducts various substances inside the cell is called .................)


6) इलेक्ट्रॉनसूक्ष्मदर्शी खाली पाहिल्यास तंतुकणिका .............आवरणांची बनलेली दिसते.(Under the electron microscope, a mitochondrion is seen as a .................. membrane structure.)


7) पेशीतील घटकद्रव्याची साठवण करणारे पेशीअंगक म्हणजे .......... होय. (............ are the storage sacs for solid or liquid contents.)


8) लवके ही द्विपटलयुक्त असून ....... प्रकारांची असतात.(Plastids have double membrane and are of.........types.)


9) प्राणीपेशी पेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या ........ असते.(Plant cells have ........... mitochondria than animal cells.)


10) वनस्पतींच्या पानांना पिवळा रंग .......मुळे प्राप्त होतो .(The leaves of the plant turn yellow due to .......)


No comments:

Post a Comment